More

    कवी विलास बाबर यांना ‘साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी’ची मानद डॉक्टरेट प्रदान

    Published on:

    ​पुणे : (प्रतिनिधी – जगदीप वनशिव)

    कात्रज येथील वंडरसिटीमधील रहिवासी आणि साहित्यिक कवी विलास तुकाराम बाबर यांना ‘साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी’तर्फे साहित्यातील मानद डॉक्टरेट (Doctorate in Literature) पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

    ​ग्लोबल अचिव्हर्स कौन्सिलच्या वतीने आयोजित या विशेष सोहळ्यात साहित्य, समाजसेवा आणि वैचारिक नेतृत्व या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. चेन्नई येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला.

    ​या दीक्षांत समारंभास टी.एन.पी.ई.एस.यू. चे माजी कुलगुरू डॉ. ए. एम. मूर्ती, तामिळनाडूचे माजी न्यायमूर्ती डॉ. के. व्यंकटेशन, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते याअर कण्णन तसेच चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते चिन्नी जयंत आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टोरल पोशाख, पदक आणि प्रमाणपत्र देऊन विलास बाबर यांचा गौरव करण्यात आला.

    ​दरम्यान, डॉ. विलास बाबर यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल ‘रानकवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य’ या संस्थेकडूनही त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १०० व्या राज्यस्तरीय पुणे मराठी काव्य संमेलनात त्यांना या वर्षीचा ‘ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

    ​साहित्य आणि समाजसेवेतील या बहुमोल कामगिरीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि साहित्यिक वर्तुळातून डॉ. विलास तुकाराम बाबर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here