माजलगाव | प्रतिनिधी
फुले पिंपळगाव (ता. माजलगाव) येथील ईगलवूड इंग्लिश स्कूलने दहावी सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षेत यशाचे शिखर सर केले असून, शाळेची विद्यार्थिनी जान्हवी वाघ हिने ९९.६०% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून गुणवत्तेची ही परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
या परीक्षेस शाळेतील एकूण १०५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २१ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. २५ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त, १९ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा जास्त, तर २० विद्यार्थ्यांनी ६०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांची नामावली:

शाळेत जान्हवी वाघ (९९.६०%) हिने प्रथम, तेजस्विनी सोलंके (९८.४०%) हिने द्वितीय, तर लखन सावंत (९७.२०%) याने तृतीय क्रमांक पटकावला.
विषयनिहाय विशेष प्राविण्य:
अनेक विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विषयांत नैपुण्य मिळवले आहे:
- इंग्रजी, मराठी व संस्कृत: जान्हवी वाघ (१०० गुण)
- माहिती तंत्रज्ञान (IT): जान्हवी वाघ, राघव पवार, आदित्य आतकरे, तेजस्विनी सोळंके आणि अर्णव भुतडा (प्रत्येकी १०० गुण)
- सामाजिक शास्त्र: महेश डाके (९९ गुण)
- विज्ञान: जान्हवी वाघ व तेजस्विनी सोळंके (९७ गुण)
- गणित: जान्हवी वाघ व राघव पवार (९५ गुण)
या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना पवार, सचिव डॉ. शरद पवार, विश्वस्त डॉ. सुशील लोढा आणि प्राचार्य सत्यजित सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे माजलगाव तालुक्यासह जिल्ह्यात कौतुक होत आहे