More

    मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा ‘रणशिंग’ फुंकणार; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा

    Published on:

    ​फडणवीसांनी शब्द पाळला नाही तर मोठे आंदोलन उभं करू; उपसमितीच्या भूमिकेवरही डागली टीकेची तोफ

    ​जालना:

    मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. “मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिले होते, मात्र तो शब्द पाळला नाही तर पुन्हा एकदा राज्यात सर्वात मोठे आंदोलन उभारून गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

    ​गुन्हे मागे घेण्यावरून सरकारवर निशाणा

    सद्यस्थितीत मराठा आंदोलकांवरील ६० ते ६२ गुन्हे न्यायप्रविष्ट असून, ८० गुन्ह्यांबाबत विभागीय समितीचा अहवाल येणे अद्याप प्रलंबित आहे. या दिरंगाईवरून जरांगे यांनी संताप व्यक्त केला. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दापासून फिरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी आपण आपला पवित्रा बदलणार नाही. सरकारला दिलेला शब्द पूर्ण करावाच लागेल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

    ​विखे पाटील आणि उपसमितीवर कडाडून टीका

    यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. “मराठा उपसमिती समाजाला न्याय देण्याऐवजी त्यांची थट्टा करत आहे. मराठा समाजात फूट पाडण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

    ​इतर प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

    केवळ गुन्हे मागे घेण्यावरच नाही, तर ‘सारथी’ संस्थेचे प्रश्न, आरोग्य विभागातील भरती आणि ईबीसी सवलतींच्या मुद्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “ओबीसी समाजाला ज्याप्रमाणे सर्व योजनांचा लाभ मिळतो, तशाच सर्व योजना मराठा समाजालाही लागू कराव्यात. सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा सरकारला मराठ्यांच्या संघर्षाला सामोरे जावे लागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here