More

    रोहित पवारांच्या घातपाताच्या शक्यतेमागे नेमके तर्क काय?:केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांवरील संशयाच्या कारणासह त्यांनी जमा केलेल्या पुराव्यांची A टू Z माहिती वाचा

    Published on:

    [%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4 %E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87 %E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%87 %E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF %E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3 %E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2
    आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सादरीकरण करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. विमानाची वेळ का बदलली, पायलट का बदलले गेले, विमानाच्या देखभालीची स्थिती काय होती आणि सर्व चित्रफीत नोंदींची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. VSR कंपनी सर्व नियमांचे उल्लंघन करून विमाने उडवत असल्याचा आरोप करत त्यांनी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन सर्व विमाने जप्त करावीत आणि कंपनीवर तात्काळ बंदी घालावी, असे म्हटले. DGCA कडून या बेकायदेशीर कृत्यांना अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याची शक्यता व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पवारांनी केली. केंद्रीय मंत्रालय आणि DGCA या दोन्ही संस्था VSR ला मदत करत असल्याने पारदर्शक चौकशीवर प्रश्नचिन्ह असल्याचे ते म्हणाले. माजी अधिकारी, माजी न्यायाधीश, राज्य व लोकसभेतील विरोधी पक्षनेते, कुटुंबीय आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, तसेच सीबीआय तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. 2004 चे सरकारी Citation XLS विमान पडून असून ARROW ला पैसे का दिले जातात, तसेच मोहित शर्मा आणि कॅप्टन दळवी लक्ष का देत नाहीत, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. रोहित पवार यांनी दिलेले प्रेझेंटेशन जसेच्या तसे…. या कारणांमुळेच तर कंपनीवर कारवाई करण्यास विलंब होतोय का? कारवाईस विलंब करून कंपनी मालकाला देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली जातेय का?…..या प्रश्नांची उत्तरे यंत्रणांनी द्यावीत. आमच्या प्रमुख मागण्या :

    १) विमानाची वेळ का बदलली ? पायलट का बदलले गेले? विमानाचा maintenance ? सर्व cctv फुटेज याची विस्तृत चौकशी करण्याची गरज. २) VSR कंपनी सर्व कायद्यांचे उल्लघन करून विमाने उडवत आहे, या कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन सर्व विमाने ताब्यात घ्यावीत, कंपनीवर तत्काळ बंदी घालावी … ३) DGCA कडून VSR करत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांना अप्रत्यक्ष समर्थन दिले जात आहे.. DGCA आणि VSR यांची मिलीभगत असल्याची दाट शक्यता…. DGCA च्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ४) Who Is Shweta Singh? ५) केंद्रीय विमान उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची भूमिका देखील VSR कडे झुकणारी असून केंद्रीय मंत्री पारदर्शक चौकशी होऊ देतील यात शंका आहे, त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्यांचा देखील राजीनामा घ्यावा. ६) चौकशी समिती – केंद्रीय विमान मंत्रालय तसेच DGCA या दोन्ही संस्था VSR ला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या कृती करत आहेत. त्यामुळे या अपघाताची पारदर्शक चौकशी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. आमची मागणी – माजी अधिकारी, माजी न्यायाधीश, राज्याचे विरोधीपक्ष नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, कुटुंबातील सदस्य यांच्यासह काही तज्ञांच्या समितीच्या निरीक्षणात चौकशी व्हावी. VIP प्रवास माजी अधिकारी कर्वे साहेब स्वतः जाऊन माहिती घ्यायचे. सध्याचे मोहित शर्मा, कॅप्टन दळवी स्वतः लक्ष घालत नाहीत का? CBI चौकशी सरकारी विमान 2004 Citation XLS पडून आहे, ARROW ला फुकटचे पैसे का ?
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/rohit-pawar-union-civil-aviation-minister-probe-aircraft-accident-137236589.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here