
धक्कादायक! नवी मुंबईतील रबाळे येथे शिक्षिकेच्या जातीवाचक अपमानामुळे 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
नवी मुंबई तील रबाळे येथे अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथील एका 16 वर्षीय चर्मकार समाजातील विद्यार्थिनीने शाळेतील शिक्षिकेने केलेल्या सार्वजनिक जातीवाचक अपमानामुळे गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. परीक्षा सुरू असताना ही अपमानकारक घटना घडल्याने या निरागस मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पीडित केवळे कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
या घटनेबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हप्रकाश आंबेडकर यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतला आहे. आरोपी असलेल्या सुशीलादेवी देशमुख शाळेतील शिक्षिकेला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून केला जात असून, तिच्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आंबेडकरांनी या कृतीला ‘आश्चर्यकारक‘ आणि ‘निंदनीय’ असे म्हटले आहे.वंचित बहुजन आघाडीची कठोर शिक्षेची मागणीवंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे.
आरोपी शिक्षिकेला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे आणि न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याचे जाहीर केले आहे.