बुलढाणा/परभणी | वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा
पुणे: महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक आणि प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे सर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे बुलढाणा येथील भीम जयंती उत्सवादरम्यान त्यांना मिळालेले अफाट प्रेम. एका चाहत्याने चक्क स्वतःच्या रक्ताने कांगणे सरांचे चित्र रेखाटून त्यांना भेट दिले, ज्यामुळे सर कमालीचे भावूक झाले आहेत.
शब्दात व्यक्त न होणारा सन्मान
“काल बुलढाणा येथे भीम जयंती उत्सवानिमित्त जाण्याचा योग आला. तिथे पोरांनी स्वतःच्या रक्ताने रेखाटलेले चित्र भेट दिले. केलेला मान-सन्मान शब्दात व्यक्त नाही होऊ शकत.”
अशी पोस्ट कांगणे सरांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सरांच्या साध्या आणि संवाद कौशल्यामुळे राज्यभरातील तरुण त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात, याची प्रचिती पुन्हा एकदा या घटनेने आली.
प्रकृतीची चिंता: शुगर कंट्रोल करावी लागणार
सततचे दौरे, व्याख्याने आणि विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी यामुळे सरांच्या प्रकृतीवर ताण येत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे कबूल केले. “लोकांचं प्रेम वाढलं, कार्यक्रम वाढले मात्र स्वतःला वेळ कमी होत चालला आहे. आता शुगर कंट्रोल करावी लागणार आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. जागरण आणि धावपळीमुळे कधीकधी स्वभाव चिडचिडा होतो, पण विद्यार्थ्यांचे प्रेम हीच आपली ऊर्जा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१ मे पासून परभणीतच जास्त वेळ
सततच्या प्रवासाला थोडा लगाम घालत, १ मे पासून आपण आपल्या हक्काच्या ‘परभणी’ जिल्ह्यातच जास्त वेळ थांबणार असल्याचे सरांनी जाहीर केले आहे. रात्री उशिरापर्यंत बुलढाण्यात वेळ देऊन पहाटे साताऱ्यात पोहोचलेल्या सरांनी, “सर्वांचे प्रेम असेच राहू द्या” असे आवाहन करत तरुणांच्या काळजाला हात घातला आहे.
📢 ताज्या बातम्या व चालू घडामोडी साठी आमचा व्हॉट्सअँप चॅनल फॉलो करा: येथे क्लिक कर