More

    चाकणमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ५७ लाखांच्या मुद्देमालासह ८४ किलो गांजा जप्त, दोघांना बेड्या

    Published on:

    ​चाकण (वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा):

    पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त केला असून दोन तरुणांना रंगेहाथ अटक केली आहे. आरोपींकडून गांजा, एक स्कॉर्पिओ वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    ​अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय २४, रा. खंडोबामाळ, चाकण) आणि कुशल उद्धव पाठक (वय २४, रा. शिवसाई नगर, कोथरूड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    ​अशी झाली पोलिसांची कारवाई

    ​अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास गस्त घालत होते. याच दरम्यान रुबी बेकरी परिसराजवळ काही व्यक्ती संशयास्पद रितीने अमली पदार्थांची तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

    ​माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून चाकण येथील खंडोबामाळ भागात दबा धरून सापळा रचला. संशयित आरोपी त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ वाहनाची कसून झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.

    ​जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील:

    • ​गांजा: ८३ किलो ९६० ग्रॅम (बाजारपेठेतील किंमत ४१.९८ लाख रुपये)
    • ​वाहन: गुन्ह्यात वापरलेली एक स्कॉर्पिओ कार
    • ​इतर साहित्य: ३ महागडे मोबाईल फोन आणि रोख रक्कम
    • ​एकूण जप्त मुद्देमाल: ५७,७३,५१० रुपये

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here