पात्रुड मध्ये पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम मटक्याचा दणका
ग्रामीण पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
वर्तमान महाराष्ट्र/(पृथ्वीराज निर्मळ)
तालुक्यातील पात्रुड हे गाव लोकसंख्येच्या मानाने मोठे गाव असून लोकसंख्येच्या मानाने येथील ग्रामपंचायत देखील मोठी आहे हे गाव खामगाव पंढरपूर राज्य महामार्गावर वसलेले असल्यामुळे येथे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांची रहदारी फार मोठ्या प्रमाणात असते. येथील बाजारपेठ देखील मोठी असून. येथील आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. व येथील बाजार हा जनावराच्या बाजारासाठी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. यामुळेच बाजार तळावरती व गावामध्ये अनुचित प्रकार घडू नये यामुळे व लोकसंख्येचा विचार करता पात्रुड येथे बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पात्रुड येथील बाजार तळावर पोलीस चौकी उभारण्यात आलेली आहे. मात्र ही पोलीस चौकी आठवड्याला बाजाराच्या दिवशीच उघडली जाते यानंतर सर्व कारभार रामभरोसे चालतो. पोलीसच हप्ते खोर असल्यामुळे पोलीस चौकीच्या समोर खामगाव पंढरपूर हायवे लगत अनेक अवैध धंदे चालतात यामुळे कशाची पोलीस चौकी आणि कशाचे काय ग्रामीण पोलीस हप्ता वसुली सोडतच नाय! अशी म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पात्रुड हे गाव लोकसंख्येच्या व बाजारपेठेच्या मानाने मोठे गाव असल्यामुळे येथील बाजारपेठ देखील मोठी आहे व पात्रुड या गावचा आठवडी बाजार देखील बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रशासनाने या सर्व बाजूचा विचार करून पात्रुड येथे बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस चौकी उभारण्यात आली मात्र ही पोलीस चौकी नावा रुपालाच असून या पोलीस चौकीमध्ये कधीही पोलीस कर्मचारी हजर नसतात ते फक्त आठवडी बाजाराच्या दिवशी चौकी उघडतात व अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करण्यात दंग असतात.
याचाच फायदा घेत येथील चौकीच्या आजूबाजूस अवैध धंदे करणाऱ्या लोकांनी खुलेआमपणे खामगाव पंढरपूर राज्य महामार्गावर असणाऱ्या हॉटेलमध्ये पान टपरी मध्ये व गल्लीबोळी मध्ये खुलेआम पुणे मटका चालत असून बाजार तळावर लायसन्स नसणारे देखील देशी दारूची विक्री करत आहेत. पात्रुड येथील पुलाच्या शेजारी पान टपरीच्या नावावर खुलेआम देशी दारू व हातभट्टी विक्री केली जाते हे सर्व धंदे ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिचून सुरू असताना ग्रामीण पोलीस मात्र या सर्व अवैद्य धंद्यावाल्याकडून हप्ता वसुली करतात. व गावांमध्ये कसल्याच प्रकारचे अवैध धंदे चालू नसल्याच्या अविर भावात वावरतात.
पात्रुड या ठिकाणी मटका नावाच्या जुगारावर दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होते हा धंदा पोलीस चौकीच्या समोरच असलेल्या हॉटेल, टपरीवर चालतो जणू काही या मटक्यावाल्यांनी मटका जुगार चालवण्याचे लायसन काढले आहे असे ते खुलेआम पणे पात्रुड मध्ये मटका जुगार चालवतात. यामुळे येथील ग्रामस्थ या मटक्याच्या जुगारा मुळे त्रस्त असून येथील काही लोकांचे संसार यामुळे उघड्यावर पडण्याची वेळ आली असून येथील जनतेच्या मनामध्ये पोलिसा विषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होत आहे.
पात्रुड मध्ये पोलिसांच्या नाकावर टिचून खुलेआम मटक्याचा दणका चालू असून ग्रामीण पोलीस अर्थपूर्ण व्यवहारातून अवैद्य धंद्यावर दुर्लक्ष करीत आहेत.