वर्तमान महाराष्ट्र

Type and hit Enter to search

शैक्षणिकसंपादकीय

आपला मुलगा-मुलगी अधिकारी झाले पाहिजे यासाठी आई वडीलांने पुढे येऊन पुढाकार घ्यावा- रामेश्वर खानाळ

Avatar of वर्तमान महाराष्ट्र
वर्तमान महाराष्ट्र
13 जून 2022 2 Mins Read
8 Views
0 Comments

आपला मुलगा मुलगी अधिकारी झाले पाहिजे यासाठी आई वडीलांने पुढे येऊन पुढाकार घ्यावा- रामेश्वर खानाळ

वर्तमान महाराष्ट्र /(पृथ्वीराज निर्मळ)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव बीड येथे मा. प्रकाश भैय्या सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली ना नेता ना पक्ष सर्व धनगर समाज एकत्र हेच लक्ष या विचारांना समाजाने मोठा प्रतिसाद दिला. या जन्मोत्सव कार्यक्रमाचे रामेश्वर खानाळ पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा अधिकारी उस्मानाबाद , स्वागत अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे, प्रमुख पाहुणे हनुमंत राव काळे, कृषी अधिकारी, विकास कोरडे नायब तहसीलदार बीड, शरद माळशिकारे तुरुंग अधिकारी बीड, सुंदरराव काकडे मंडलाधिकारी बीड, महादेव हजारे ग्रामसेवक, डॉ. हनुमंत पारखे, अर्जुन मासाळ सर, व पोलीस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, कृषीअधिकारी, महावितरण अधिकारी, ग्रामसेवक, परिवहन अधिकारी, युवा उद्योजक, मेंढपाळ बांधव यांच्या उपस्थितीत बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा येथे माता-भगिनी पत्रकार बांधव व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमास संबोधित करताना मा. रामेश्वर खानाळ साहेब (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद) यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपला विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्याला चांगलं घडवलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे वेळोवेळी आपण विद्यार्थ्याला मार्गदर्शन करून शिक्षणासाठी शहरांमध्ये आणून क्लासेस लावून आपला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन आपला विद्यार्थी घडला पाहिजे. जर आज आपला एक अधिकारी झाला तर नक्कीच तो अधिकारी अनेक अधिकारी घडू शकतो असे खानाळ साहेब यांनी बोलताना सांगितले.
आपण अहिल्यादेवी होळकरांचे वारसदार आहोत अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जागा करण्यासाठी आपण गावोगावी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव साजरा करून अहिल्यादेवी होळकरांचे कार्य देशभरामध्ये आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे यासाठी सर्व समाज बांधवांनी जागृत झाले पाहिजे. ज्यांची जन्मभूमी (चोंडी अहमदनगर) आहे व त्यांची कर्मभूमी हे भारत देशभर आहे अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे अशी लवकरच मागणी मा. मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन करून अखंड महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तरी आपण या निवेदना करता आपली उपस्थिती आपला हक्क आपली मागणी यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. असे स्वागत अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी या जन्मोत्सव कार्यक्रमास संबोधित करताना म्हटले आहे.
या कार्यक्रमास विशेष गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाली असे ज्ञानेश्वर देवकते यांचा सर्व प्रमुख उपस्थितांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये ज्यांनी १४ व्या वर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर गीत गायन केले असे अर्जुन महानोर यांचा सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील खेड्यातील वाडी-वस्ती तांड्यावरून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती बीड जिल्हा अध्यक्ष शीतल मतकर, उपाध्यक्ष भारत गाडे, बाळासाहेब गावडे, ज्ञानेश्वर ढोरमारे, पवन गावडे, विकास सोनसळे, हनुमंत राहिंज, राहुल ठेंगल, विशाल प्रभाळे, विजय घोंगडे, सोपानराव गावडे सरपंच, नारायण भोंडवे सरपंच, रवी गाडेकर सरपंच, सखाराम गोरे सरपंच, भागवत गावडे, भाऊसाहेब सोनसळे, अशोक पांढरे, बापू प्रभाळे, माऊली मार्कड, शरद मार्कड, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जाधव सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल शेळके यांनी केले.

Share Article

Avatar of वर्तमान महाराष्ट्र
Follow Me Written By

वर्तमान महाराष्ट्र

Other Articles

Previous

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापुजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण

Next

पात्रुड गावचा चेहरामोहरा बदलण्यात व गावचा सर्वांगिन विकासात मनसबदार कुटुंबाचे महत्वपूर्ण योगदान

Next
14 जून 2022

पात्रुड गावचा चेहरामोहरा बदलण्यात व गावचा सर्वांगिन विकासात मनसबदार कुटुंबाचे महत्वपूर्ण योगदान

Previous
13 जून 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापुजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण

No Comment! Be the first one.

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

All Right Reserved!