More

    जि .प व प. स. च्या निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप

    Published on:

    सांडस चिंचोली येथे शिवसेना शाखा स्थापन

    माजलगाव / ( प्रतिनिधी)
    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्यासाठीच शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी केले आहे.
    तालुक्यातील सांडस चिंचोली येथे शिवसेना उपतालुकाप्रमुख माऊली कदम यांनी शिवसेनेची शाखा उद्घाटन चे आयोजन दि. २४ जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी ७ वा. मोठ्या उत्साहात करण्यात आले या वेळी उद्घाटक म्हणून जगताप बोलत होते.
    कार्यक्रमास किसान सेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. बापूसाहेब जाधव शिवसेना बीड तालुकाप्रमुख संतोष जाधव शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, शिवसेना शहरप्रमुख धनंजय पापा सोळंके, उपजिल्हाप्रमुख नितीन मुंदडा, युवा सेना तालुकाप्रमुख अभिजीत कोंबडे, धोंडीराम जाधव आदी उपस्थित होते.
    यावेळी पुढे बोलताना जगताप म्हणाले की अखंड हिंदुस्तानाचे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि यांचा विचाराचा वारसा शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब संसद रत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब चालवत आहेत त्यांनी सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य माणसाला मिळाला पाहिजे यासाठी ते रात्रंदिवस काम करत आहे आणि शासनाने या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या योजना राबवल्या आहेत त्या योजनेचा लेखाजोखा जनतेसमोर घेऊन जाण्याचे काम शिवसैनिकांना करावे लागणार आहे आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्यासाठीच शिवसैनिकांनी कामाला लागावे असे भावनिक आव्हान अनिल दादा जगताप यांनी केले आहे.
    यावेळी अँड बापूसाहेब जाधव तुकाराम येवले धनंजय पापा सोळंके यांचेही समायोजित भाषणे झाली.
    यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सचिन कदम उपशाखाप्रमुख महादेव बादाडे सचिव बापू शेजुळ सहसचिव गणेश काळे कोषाध्यक्ष कैलास शिंदे सदस्य संभाजी कदम गणेश काटवटे शंकर भोसले रवींद्र कदम अमर कदम करण कदम लक्ष्मण भोसले काकागिरी सुंदर पवार ओम कदम नितीन चौधरी आदी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here