More

    बाबासाहेब ते बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्ता हस्तगततेचा मार्ग एकच आहे.

    Published on:

    मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे. आज आपण जे काही आहोत. ही सर्व देण महापुरुषांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या क्रांतीच्या वेलीवरील आपण फळं फुलं आहोत. या बहरून आलेल्या झाडाच्या मुळाशी जर कोणी घाव घालत असेल तर आपलं अस्तित्व नष्ट होण्यास काहीच वेळ लागणार नाही. म्हणून फुले , शाहु यांनी दिलेल्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उद्धारासाठी दिलेलं आरक्षण शाबूत राहण्यासाठी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लखलखत्या विजांच्या कडकडाटासह उन वारा पाऊस धारा डोक्यावर झेलून चिखलाने माखलेले रस्त्यातून मार्ग काढून तुमच्या आमच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढली .

    कारण हा आपल्या जीवन मरणाचा प्रसंग आहे. की आमच्या हक्काचं आरक्षण टिकलं पाहिजे या साठी ही यात्रा , स्वतः बाळासाहेब महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहचून शरीराची पर्वा न करता सांगत होते की आरक्षण धोक्यात आहे. म्हणून त्यांच्या आवाजाला ओ देणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या हक्काचं आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे , तसेच गाव गाड्यात निर्माण झालेला ताण तणाव शांत होऊन येथील माणूस हा बंधुत्वानं जगाला पाहिजे . ही या मागची भूमिका आपल्याला दिसून येते .

    वंचित बहुजन आघाडी मध्ये बाळासाहेबांनी प्रत्येक अठरा पगड समूहातील जातीतील लोकांना सोबत घेऊन जातीयतेचे भरून आलेले अराजक्तेचे आभाळ पळून लावले हे मात्र नक्की याचीच धास्ती येथील प्रस्थापित पक्षांनी घेतल्यामुळे बाळासाहेबांना बदनाम करण्यासाठी चौका चौकात गल्ली बोळीत, सोशल मीडियातील काही पत्रकार आणि जात्यांध वैचारिक सालगडी यांना गावातील सांडा प्रमाणे पोसुन यांच्या तोंडून बाळासाहेबांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे .

    की बाळासाहेब भाजपची बी टीम आहे वगैरे वगैरे अश्या अनेक प्रकारचे आरोप करून वंचित बहुजन आघाडीला बदनाम करत आहे. त्यांची घराणेशाही वाचविण्यासाठी कारण त्यांना माहीत आहे . की वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे . म्हणून आपल्यातील फूट पाडण्यात ते सतत व्यस्त असतात. आपल्यातील बंडगुळ्यांना सोबत घेऊन बाळासाहेबांच्या वंचित बहुजन सत्तेच्या राजकारणात व्यत्यय आणत आहे . परंतु या अश्या कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नये नव्या जोमाने आपल्या कामाला लागावे बाळासाहेबांचे विचार वंचित मतदार यांच्या पर्यंत कसे पोहोचतील याच कडे लक्ष द्यावे ,प्रत्येक ठिकाणी गावा पासून शहारा पर्यंत आता पासून बूथ बांधणी मजबूत करावी. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

    कारण मित्रहो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा या व्यवस्थेतील राजकीय पक्षाच्या लोकांनी खूपच छळलेले आहे, हा इतिहास साक्षीला आहे. बाबासाहेबांवर सुद्धा अश्याच प्रकारचे आरोप येथील प्रस्थापित असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी त्या काळात लावले होते . हे आपल्यासाठी काही नवीन नाही आता फक्त आपण मजबूत राहायला पाहिजे .आणि यांच्या मनातील कपटी डाव हाणून पाडायला पाहिजेत तरच आपण आंबेडकरवादी असू आणि आपल्या समदुःखी समविचारी सर्वच घटकातील लोकांना सोबत घेऊन आपला लढा आपल्याला जिंकायचा आहे.

    बाबासाहेब आणि बाळासाहेब यांचे राजकीय गणित किती साम्य आहे. म्हणजे दलित फेडरेशन आणि वंचित बहुजन आघाडी

    मध्य प्रदेश दलित फेडरेशन शाखेच्या वतीने, ता. १५ ऑक्टोबर १९५६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ, नागपूर मधील श्याम हॉटेल मध्ये छोटीशी चहा पार्टी देण्यात आली होती. या समारंभास सौ. माईसाहेब होत्या. शिवाय, दलित फेडरेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांपैकी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, श्री. दादासाहेब गायकवाड, श्री. हरिदास आवळेबाबू, श्री. मेश्राम, श्री. कुंभारे, श्री. गोंडाणे, श्री. जी. टी. परमार (गुजरात), श्री. ए. जी. पवार, श्री. आर. डी. भंडारे व श्री. बी. सी. कांबळे वगैरे हजर होते. प्रथम श्री. हरिदास आवळेबाबू यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजर राहून उपकृत केल्याबद्दल डॉक्टर साहेबांचे आभार मानले नंतर, दलित फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शनपर दोन शब्द सांगावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली. “आपल्या आजपर्यंतच्या फेडरेशनच्या चळवळीने स्वाभिमान अवश्य निर्माण केला. ही गोष्ट फेडरेशनला भूषणावह आहे. त्यामुळे संघटना झाली. तथापि त्यामुळे एक प्रकारची तटबंदीही निर्माण झाली. दुसरे लोक आम्हाला मत देत नाहीत व आपण लोक त्यांना मत देत नाही, ही एक प्रकारची तटबंदीच होय. दुर्दैवाने आपली लोकसंख्या कमी आहे. आपण केवळ अल्पसंख्यांक आहोत. अशा परिस्थितीत फेडरेशन आहे त्या स्थितीत ठेवणे कठीण आहे. यासाठी इतर समाजातील आमचे दुःख जाणणारे कोण आहेत हे पाहिले पाहिजे.

    अशा सर्वांना आपण एकत्रित करून त्यांच्यासह जाण्याची आपली सिद्धता पाहिजे. अशा लोकांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तो प्रयत्न यशस्वी झाल्यास आपल्याला नवीन पक्ष स्थापावा लागेल व त्या पक्षात आपल्याशिवाय इतरांनाही दार मोकळे राहील. तुमच्यातच नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसून येते. ती ही की आज झाड लावले की त्यास दुसऱ्या दिवशी फळ खावयास आले पाहिजे, असे लोकांना वाटते. राजकारणात अशी अपेक्षा धरणे चूक आहे. इंग्लंडमधील राजकारण घ्या. तेथील ब्रिटिश मजूर पक्षाचा इतिहास काय सांगतो. १९०० साली त्यांचे फक्त दोन लोक पार्लमेंटात निवडून आले. १९०६ साली त्यांना सुमारे १४ जागा मिळाल्या, १९२४ पर्यंत त्यांना विशेष यश नव्हते. त्या साली मात्र त्यांचे जवळजवळ १२५ लोक निवडून तो खरा विरोधी पक्ष बनला. अशा तन्हेने राजकारण हा दमाचा व धीराचा खेळ आहे. ज्यांना दम, धीर नाही त्यांना राजकारण करता यावयाचे नाही. आता इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करावयास तुम्ही शिकले पाहिजे. तुमच्यात तुम्ही फूट ठेवून चालणार नाही. माझ्या दबदब्यामुळे अजून काही वेडेवाकडे घडत नाही. पण मी तुम्हासाठी कोठपर्यंत राहाणार ? आता उमेदवार निवडण्याचे काम लोकांनीच केले पाहिजे. लोकांमध्ये तुम्ही काम केले पाहिजे. त्यांच्या अडीअडचणींना तुमच्या ताकदीप्रमाणे वाचा फोडली पाहिजे. त्यांच्या सुखदुःखाशी समरस होण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मी भंडाऱ्यातील निवडणुकीमध्ये पडलो त्याचे मला कधी वाईट वाटले नाही. तरी त्या निवडणुकीत मला बरीच मते पडली. आपली मते सोडली तर इतर समाजाने देखील मला मते दिलेली आहेत. ही गोष्ट माझ्या समाधानाची आहे.

    यांचा इतिहास अभ्यासला असता आपल्या लक्षात येईल की श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी किती प्रामाणिक आहेत . हे अत्यंत महत्वाचे आहेत. ते आपल्याला त्यांच्या एका समारंभातील त्यांच्या भाषणातून दिसून येते त्या भाषणातील काही अंश पुढील प्रमाणे आहे.

    तुम्हीही अशाचप्रकारे कर्तबगार होण्याचा प्रयत्न करून, इतर समाजास देखील तुम्हास मते द्यावीत असे वाटले पाहिजे. माझी खात्री आहे की या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचे राजकीय जीवन व कार्यक्रम चालवाल. यापेक्षा आता अधिक काही मी सांगत नाही.”

    सांगायचे तात्पर्य म्हणजे बाबासाहेब आणि बाळासाहेब यांची धडपड एकच आहे. की वंचित सत्तेत कसा बसविता येईल याचे आपण चिंतन करणे अत्यंत महत्वाचे आहे. आज ही बाळासाहेब येथील भयभीत झालेल्या माणसाला ठासून सांगतात की “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!” पण माझ्या वंचित बांधवांनो हा लढा जागृत ठेवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब यांनी आपल्यावर प्रचंड जबाबदारी सोपविली आहे. ती म्हणजे ओबीसी चे १०० आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. याच बरोबर उरलेल्या ५४ जागी एस सी एस टी चे आमदार निवडून द्यायचे आहेत. या साठी प्रत्येकानी एकमेकाला सहकार्य करणे ही काळाची गरज आहे . नाही तर आपल्या घासातील घास गेला म्हणून समजा , यासाठी येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. म्हणून माझ्या सर्व बहुजन बांधवांना पुन्हा नम्र आवाहन आहे की तुमच्या डोक्यातील मेंदू हा तुमच्याच डोक्यात ठेवा दुसऱ्याचा उसना मेंदू घेऊन भूलथापांना बळी पडू नका आणि वंचित बहुजन आघाडीला सत्तेत पाठवा कारण

    त्यांच्या पहिल्या हाकेला ओ दया आणि आपल्या पीढीला समृद्ध करा तरच आपण सत्तेत जाऊ नाही तर आपले मागचे गुलामीचे दिवस पुढे यायला जास्त दिवस लागणार नाहीत. म्हणून आपलं मत वाया जाईल या गोड विषाला बळी पडू नका , कोणत्याही पक्षाच्या आमिषाला बळी न पडता कोणत्याही भुलथापाना भुलून जाऊ नका वंचित बहुजन आघाडीला येत्या विधान सभेत मतदान करून सहकार्य करा व आपल्या हक्काचे सरकार प्रस्थापित करा ही नम्र विनंती.

    चला बाळासाहेबांना साथ देऊया

    : प्रा.देवानंद पवार

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here