महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष सुरूच राहील: प्रकाश आंबेडकर

11 सप्टेंबर 2025
One Min Read
37 Views

लातूरमध्ये पंचशील धम्म ध्वज यात्रा

IMG 20250911 WA0042

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज लातूर येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी आयोजित पंचशील धम्म ध्वज यात्रेच्या जनसंवाद कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी त्यांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असे ठामपणे सांगितले.आंबेडकर म्हणाले की,

भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध आणि बौद्ध भिक्खूंसोबत वंचित बहुजन आघाडी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सातत्याने संघर्ष करत आहे. ते पुढे म्हणाले की, बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आणि बौद्ध भिक्खूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत बोधगया येथे गेले होते

.वंचित बहुजन आघाडीची मागणी:ॲड. आंबेडकर यांनी आपली मागणी पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले, “बौद्धांना ब्राह्मणांपासून मुक्त केले पाहिजे आणि महाबोधी महाविहाराचे पूर्ण नियंत्रण बौद्धांना दिले पाहिजे.” जोपर्यंत बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्धांच्या हाती येत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

Exit mobile version